Swami Vivekananda Pre Primary , Primary T.J Chauhan High School, Morwadi, Nashik.

स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय मोरवाडी शाळेची स्थापना २ जुलै १९८६ रोजी झाली आहे.१९९१ पासून पूर्व प्राथमिक विभागाची (बालवाडी) सुरुवात झाली आहे.

शाळा व कॉलेजमध्ये शिकून विद्यार्थी बाहेर पडले तरी त्यांना आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल आपलेपणा व प्रेम असते. संस्कारमय वयात या शाळेत बराच काळ घालविल्यामुळे तेथील शिक्षकवर्ग, एकंदरित वातावरण, मित्रपरिवार आणि अनेक कार्यक्रमातील सहभाग यामुळे या स्मृती सर्वांनाच जिव्हाळ्याच्या व आनंददायी वाटतात. याच प्रेरणेतून स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी.जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी, सिडको या शाळेने देखील माजी विद्यार्थी संघ स्थापन करून शाळेतून शिक्षण घेऊन गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठीचा एक केलेला छोटासा प्रयत्न होय.शाळा सोडून कॉलेजमध्ये गेल्यावर किंवा कॉलेजमधून बाहेरच्या जगात नोकरी वा व्यवसायानिमित्त बाहेर पडल्यावर या मित्रपरिवाराची ताटातूट होते. तरीदेखील केव्हाही आपल्या शाळेतील वा कॉलेजातील कोणीही भेटले तरी आपल्याला त्यांचा अभिमान व आपलेपणा वाटतो. माजी विद्यार्थी म्हणून आपले एक नवे नाते तयार होते. या नात्यातूनच एकमेकांना मदत करण्याची प्रेरणा मिळते.

०२ जूलै १९८६ पासून सुरू झालेला हा शाळेचा छोटासा प्रवास आज एक वटवृक्ष होऊन सुरूच आहे असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सन १९९० मध्ये दहावीची पहिली बॅच एस.एस.सी परीक्षेसाठी प्रविष्ट झाली आणि त्यानंतर आज या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळेच्या नावलौकिकात भर टाकल्याचे आपल्याला बघावयास मिळते. आज पर्यंत जवळ जवळ साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी या शाळेतून आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या व्यवसायाच्या, नोकरीच्या ठिकाणी आपल्या शाळेचे, संस्थेचे नाव मोठे केले आहे.सुरुवातीचे काही वर्ष संस्थेची पंचवटी या ठिकाणी असणारी स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी या शाळेतुन विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होत होते. आणि शाळेप्रती जोडल्या गेलेली ही नाळ अशीच पुढे वाढत जाऊन तिचे शाळेशी असलेलं नातं अजून प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनाने माजी विद्यार्थी संघ स्थापन केलेला आहे आणि या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम घेऊन माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेपर्यंत आणण्याचं काम याच माध्यमातून केले जाणार आहे आणि याचाच एक भाग म्हणजे आपण शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी एक मोठ्या स्वरूपात माजी विद्यार्थी मेळावा मोरवाडी या शाळेमध्ये आयोजित करत आहोत याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. माजी विद्यार्थी संघ याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच खाली दिलेल्या गूगल फॉर्म वर आपली माहिती प्रविष्ट करावी.

Swami Vivekananda Primary and Secondary School,Morwadi, was established on 2nd July 1986. Since 1991 the Pre Primary Section (Kindergarten) has started.

The entrance of this school is a big arch… when you go inside, you will see a big Sacred Fig (Pipal) tree… many batches are seen by this vast tree. Sitting in its huge shade, many children would have waited for their parents, uncles with rickshaws and vans after school. Even today that tree is standing in the same light.

All children gather for the assembly on the ground, a large field behind the school.Children learn a lot through real experience, action, in school along with studies!

The magnificent building of this school, which is nearing completion, is now attracting attention.

श्री. किशोर झोटिंग
(मुख्याध्यापक, माध्य.विभाग )

संपर्क– (0253) 2391627
E-mail : [email protected]

सौ. ज्योति गायकर
(मुख्याध्यापिका, प्राथ.विभाग )

संपर्क– (0253) 2391627
E-mail : [email protected]

श्री. किशोर झोटिंग
(पर्यवेक्षक, माध्य.विभाग)

संपर्क– (0253) 2391627
E-mail : [email protected]

कु. धनश्री वाडेकर
माजी विद्यार्थी
(सचिव, माजी विद्यार्थी संघ )

संपर्क– 7709993959
E-mail : [email protected]

श्रीम. अलका घरटे
माजी विद्यार्थी
(शालेय समिति अध्यक्ष, माध्य. व समन्वयक, माजी विद्यार्थी संघ)

E-mail : [email protected]

श्री. अक्षय वडनेरे
माजी विद्यार्थी
(शालेय समिति अध्यक्ष, प्राथ. व समन्वयक, माजी विद्यार्थी संघ)

संपर्क-9011757254.
E-mail : [email protected]