Indiranagar Pre Primary Alumni Assocaition

स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर या शाळेची स्थापना २ जुलै १९८४ रोजी कै. मदर लेले यांच्या प्रेरणेने झाली. बालवाडी ते इ. ४ थी पर्यंत वर्गाना जागा अपुरी पडल्याने समाजमंदिर, सिद्धी विनायक बंगला, मोदकेश्वर हॉल येथे भरविण्यात आली.

शाळा व कॉलेजमध्ये शिकून विद्यार्थी बाहेर पडले तरी त्यांना आपल्या शाळेबद्दल आपलेपणा व प्रेम असते. संस्कारमय वयात या शालेयजीवनात बराच काळ घालविल्यामुळे तेथील शिक्षकवर्ग, एकंदरित वातावरण, मित्रपरिवार आणि अनेक कार्यक्रमातील सहभाग यामुळे या स्मृती सर्वांनाच जिव्हाळ्याच्या व आनंददायी वाटतात.
स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर येथील शाळेची स्थापना 2 जुलै 1984 रोजी झाली. चाळीस वर्षांपूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वृक्षात रूपांतर होतांना अभिमानाने ऊर भरून येतो.
इंदिरानगर मधील शास्त्रीनगर या भागात 28 नंबरच्या बंगल्यात भाडेतत्त्वाने इंग्रजी माध्यमाच्या kg व First standred ची सुरुवात झाली. त्यानंतर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सन्माननीय के. पी. कुलकर्णी यांच्या 21 नंबरच्या बंगल्यात सकाळी इंग्रजी माध्यमाची Kg व first आणि दुपारच्या वेळेत मराठी माध्यम चे पहिली व दुसरीचे वर्ग सुरू झाले.
जसजशी विद्यार्थी संख्या वाढत गेली व जागा अपुरी पडल्याने पुढे मोदकेश्वर मंदिराच्या परिसरात बालवाडीचे वर्ग भरू लागले. त्यानंतर जवळच असलेल्या विवेकानंद हॉलमध्ये सुद्धा काही वर्ग भरत होते. यानंतर जिल्हा परिषद कॉलनी मधील दत्त मंदिराच्या परिसरात पत्र्याच्या वर्गात तिसरी व चौथीचे वर्ग सुरू झाले. जसजसा हा विद्येचा वृक्ष बहरत गेला. त्यानंतर त्याच ठिकाणी भाडेतत्त्वावर इमारत बांधली गेली. व मराठी माध्यमाचे इयत्ता पहिली ते सातवीच्या मराठी व सेमी माध्यमांचे वर्ग सुरू झाले. इंदिरानगर परिसरातील सर्वात जुनी इंग्रजी व मराठी शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेली शाळा आहे.
सन २००३ मध्ये दहावीची पहिली बॅच एस.एस.सी परीक्षेसाठी प्रविष्ट झाली आणि त्यानंतर आज या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळेच्या नावलौकिकात भर टाकल्याचे आपल्याला बघावयास मिळते. आज पर्यंत जवळ जवळ दोन हजार विद्यार्थ्यांनी या शाळेतून आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या व्यवसायाच्या, नोकरीच्या ठिकाणी आपल्या शाळेचे, संस्थेचे नाव मोठे केले आहे. याच प्रेरणेतून स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, इंदिरानगर, नाशिक. या शाळेने देखील माजी विद्यार्थी संघ स्थापन करून शाळेतून शिक्षण घेऊन गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शनिवार दि.२० जानेवारी २०२४ रोजी एक मोठ्या स्वरूपात माजी विद्यार्थी मेळावा, इंदिरानगर या शाळेमध्ये आपण आयोजित करत आहोत. याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.तसेच खाली दिलेल्या गूगल फॉर्म वर आपली माहिती प्रविष्ट करावी.

सौ. सुचिता भोरे
(मुख्याध्यापिका, माध्य. विभाग )
संपर्क
– (0253) 2372924
E-mail : [email protected]

सौ. विमल काकड
(मुख्याध्यापिका, प्राथ. विभाग )

संपर्क– (0253) 2371997
E-mail : [email protected]

कु. धनश्री वाडेकर, माजी विद्यार्थी
(सचिव, माजी विद्यार्थी संघ )
संपर्क– 7709993959
E-mail : [email protected]

सौ. यशश्री पंचाक्षरी
(समन्वयक, माजी विद्यार्थी संघ)
संपर्क– (0253) 2372924
E-mail : [email protected]