Swami Vivekanand Vidyalaya, Panchavati

नाशिकच्या पावनभूमीची ओळख म्हणजे पंचवटी पंचवटीतील या पाच वडांमधील एक वटवृक्ष जणू स्वामी विवेकानंद विद्यालय, हा वटवृक्ष नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी मजबूत व खंबीरपणे आजही डौलाने उभा आहे एवढेच नाही तर याच्या पाऊलखुणा विविध शाखांच्या माध्यमातून शहरभर पसरलेल्या आहेत…!

शाळा व कॉलेजमध्ये शिकून विद्यार्थी बाहेर पडले तरी त्यांना आपल्या शाळेबद्दल आपलेपणा व प्रेम असते. संस्कारमय वयात या शालेयजीवनात बराच काळ घालविल्यामुळे तेथील शिक्षकवर्ग, एकंदरित वातावरण, मित्रपरिवार आणि अनेक कार्यक्रमातील सहभाग यामुळे या स्मृती सर्वांनाच जिव्हाळ्याच्या व आनंददायी वाटतात. स्वामी विवेकानंद इग्लिश मिडियम स्कूल, रविवार पेठ ही स्वामी विवेकानंद सोसायटीची सर्वात पहिली शाळा. शाळेची स्थापना १९७१ रोजी झाली.

सन १९६८ मध्ये दहावीची पहिली बॅच एस.एस.सी परीक्षेसाठी प्रविष्ट झाली आणि त्यानंतर आज या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळेच्या नावलौकिकात भर टाकल्याचे आपल्याला बघावयास मिळते. आज पर्यंत जवळ जवळ अकरा हजार दोनशे त्र्याह्त्तर विद्यार्थ्यांनी या शाळेतून आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या व्यवसायाच्या, नोकरीच्या ठिकाणी आपल्या शाळेचे, संस्थेचे नाव मोठे केले आहे. याच प्रेरणेतून स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय पंचवटी, नाशिक. या शाळेने देखील माजी विद्यार्थी संघ स्थापन करून शाळेतून शिक्षण घेऊन गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शनिवार दि.२७ जानेवारी २०२४ रोजी एक मोठ्या स्वरूपात माजी विद्यार्थी मेळावा, मोरवाडी या शाळेमध्ये आयोजित करत आहोत याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.तसेच खाली दिलेल्या गूगल फॉर्म वर आपली माहिती प्रविष्ट करावी.

श्रीम.उज्वला माळी
(मुख्याध्यापिका, माध्य. विभाग)

संपर्क-(0253) 2512314
E-mail : [email protected]

श्रीम.अक्षदा दुबे
(मुख्याध्यापिका, पूर्व प्राथ व प्राथ विभाग
)
संपर्क-(0253) 2572313
E-mail : [email protected]

श्रीम. शुभदा टकले
माजी विद्यार्थी
(पर्यवेक्षिका, माध्य. विभाग)

संपर्क–(0253) 2512314
E-mail : [email protected]

कु. धनश्री वाडेकर
माजी विद्यार्थी

(सचिव, माजी विद्यार्थी संघ )
संपर्क- 7709993959

श्रीम. ऐश्वर्या कूटे
माजी विद्यार्थी
(समन्वयक, माजी विद्यार्थी संघ, इंग्रजी माध्यम )

E-mail : [email protected]

श्री. लैलेश नाईक
माजी विद्यार्थी
(समन्वयक, माजी विद्यार्थी संघ, मराठी माध्यम )

E-mail : [email protected]

श्रीम. माधुरी बागल
माजी विद्यार्थी
(समन्वयक, माजी विद्यार्थी संघ, मराठी माध्यम )

E-mail : [email protected]