Swami Vivekanand Vidyalaya, Panchavati

As Ravivar Peth school was upto 4th standard only.Mother decided to start further standards i.e. 5th to 10th at Panchavati.

“Eternal work is done by a person who knows the steps of time ” and such a person who knows the steps of time was late. Mother Lele who was an Indian Hindu Culture follower, realized the importance of English as an international language while preserving the culture. And the first  government granted English medium secondary school was established and was named Swami Vivekananda school in 1971..!

Within a short period of  time Swami Vivekananda School earned respect due to its disciplined, qualified and hard working staff.Today, the students are soaring in many fields, reaching the heights of success!!

नाशिकच्या पावनभूमीची ओळख म्हणजे पंचवटी पंचवटीतील या पाच वडांमधील एक वटवृक्ष जणू स्वामी विवेकानंद विद्यालय, हा वटवृक्ष नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी मजबूत व खंबीरपणे आजही डौलाने उभा आहे एवढेच नाही तर याच्या पाऊलखुणा विविध शाखांच्या माध्यमातून शहरभर पसरलेल्या आहेत…!

“ज्या व्यक्तीने काळाची पावले ओळखली अशा व्यक्तीच्या हातून शाश्वत कार्य घडते’ आणि अशी काळाची पाऊले ओळखणाऱ्या व्यक्ती म्हणजेच कै. मदर लेले ज्यांनी भारतीय हिंदू संस्कृतीचे जतन करत इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषेचे महत्त्व जाणले. आणि भारतीय संस्कृती जपणारी इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा “मदर स्कूल” अर्थात स्वामी विवेकानंद विद्यालयाची स्थापना १९७१ साली केली….!

वटवृक्षाच्या छायेत अनेक विद्यार्थी रुपी पाखरे आली त्याच्या अंगाखांद्यावर खेळली, बागडली आणि या वटवृक्षानेही सर्वांना मायेची ऊब देत तर कधी स्वयंशिस्तीचे धडे देत निस्वार्थीपणे पाखरांच्या पंखात बळ भरले. पाखरांना गरुड भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरणा दिली. पाखरे आज अनेक क्षेत्रात भरारी घेत आहेत, यशाची उंच शिखरे गाठत आहेत, हीच पाखरे एका थकल्या क्षणी कधीतरी पुन्हा एकदा या वटवृक्षाच्या आठवणीने त्याच्या छायेत विसावत आहेत, याहून अधिक आनंद तो काय वेगळा आज वटवृक्ष अनुभवतो आहे !

Contact Information

Swami Vivekanand Vidyalaya,
Near Mhasoba Mandir,
Panchavati Karanja, Panchavati, Nashik.
Contact: 0253 2512314
Principal: Mrs. Ujwala Mali

Academic Calendars

Gallery