Swami Vivekananda Secondary School, Indiranagar

In the year 2003-2004, Bhumi – poojan ceremony of this school was done by the auspicious hands of Minister of School Education, Hon. Amrish Patel and Assembly Speaker Hon. Arunbhai Gujrathi. The ceremony was attended by many respected dignitaries of Nashik.

Two- floor building was constructed in 2005 . Classes from 8th to 10th std. were shifted from Charwak Chowk, Indiranagar to Van Vaibhav.

All the enthusiastic students and equally enthusiastic teachers made this school the only school in the locality to have 100% SSC results for 5 consecutive years. Another remarkable feature of the school is that many students are national players in the Throw-ball game.


There are beautiful and spacious classrooms for students. A grand and attractive cultural hall has been constructed with the aim of celebrating cultural events, so every student can celebrate their talents. The beauty of the school has increased due to the amazing platform in front of the building.

सन २००३-२००४ साली या शाळेचा भूमीपूजन समारंभ तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री, ना. अमरीश पटेल आणि विधानसभा अध्यक्ष ना. अरुणभाई गुजराथी यांच्या शुभहस्ते पार पडला. या समारंभास नाशिकमधील अनेक सन्माननीय शारदोपासक या भव्य प्रांगणात उपस्थित होते. संस्थेचे सन्मा. तत्कालीन अध्यक्ष कै. तात्यासाहेब कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा भव्य समारंभ पार पडला.

त्यानंतर दुमजली इमारतीचे बांधकाम झाले आणि २००५ साली इ. ८ वी ते १० वी चे वर्ग संत चार्वाक चौक, इंदिरानगर येथून वनवैभव येथे स्थलांतरित झाले.

भव्य प्रांगण, सर्व उत्साही विद्यार्थी आणि तेवढेच उत्साही शिक्षक, मुख्याध्यापकांच्या प्रयत्नातून इ. १० वी ची १०० टक्के निकालाची सलग ५ वर्षांची उज्वल परंपरा असणारी परिसरातील एकमेव शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे .
क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन हेही या वैशिष्ट्य आहे . थ्रोबॉल या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू या शाळेत तयार झाले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सुंदर आणि ऐसपैस वर्गखोल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम साजरे व्हावेत, प्रत्येक विद्याथ्याने आपले कलागुण साजरे करावेत या उद्देशाने भव्य आणि आकर्षक सांस्कृतिक हॉल उभारला आहे. इमारतीच्या समोरच अप्रतिम व्यासपीठामुळे शाळेचं देखणेपण वाढले आहे. या शाळेच्या इमारतीकडे पाहतांना नकळत हात जोडले जातात आणि ओठी शब्द येतात…..गगन सदन तेजोमय,तिमिर हारुन करुणाकार दे प्रकाश अभय…||

Contact Information

Swami Vivekananda Secondary School, Shraddha Vihar, Before Guru Gobind Singh School, Indiranagar.
Contact:0253 2372924
Principal: Mrs. Suchita Bhore

Academic Calendars

Gallery