Swami Vivekananda Primary School, Indiranagar

Swami Vivekananda Primary School, Indiranagar was established on 2nd July 1984.

At the beginning from  kindergarten to standard 4th was started off at Siddhivinayak  Society in Modakeshwar hall . Since 2020 it is running at Shraddha Vihar ,Indiranagar. Students of this school are efficiently working in different fields.

स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय, इंदिरानगर या शाळेची स्थापना २ जुलै १९८४ रोजी कै. मदर लेले यांच्या प्रेरणेने झाली. बालवाडी ते इ. ४ थी पर्यंत वर्गाना जागा अपुरी पडल्याने समाजमंदिर, सिद्धी विनायक बंगला, मोदकेश्वर हॉल येथे भरविण्यात आली.

परिसरात एकही शाळा नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील सर्वच विद्यार्थी शाळेत येऊ लागले. कालांतराने बालवाडी ते इ. ४ थी पर्यंतचे सर्व वर्ग जि. प. कॉलनी, इंदिरानगर येथे एकाच इमारतीत सुरू झाले. इ. ५ वी ते ७ वी चे सेमी माध्यमाचे वर्ग याच इमारतीत दोन सत्रात सुरु झाले.

जानेवारी २०२० पासून श्रद्धाविहार येथील इमारतीत इ. १ ली ते ७ वी चे वर्ग सकाळ सत्रात भरविण्याचे संस्थेने ठरविले व त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

संस्थेची (शाळाची) उत्तरोत्तर प्रगती होत असताना या विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी नौदल, भूदल, अभियांत्रिकी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र, कलाक्षेत्र इ. विविध क्षेत्रात चांगली कामगिरी बजावत शाळेचा नावलौकिक वाढवत आहेत. इतकेच नव्हे तर परदेशातही व्यवसाय करून मोलाचे योगदान देत आहेत.

तमसो मा ज्योतिर्गमय या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार ही शाळा प्रगती करत आहे.

Contact Information

Swami Vivekanand Prathmik Vidyalaya,
Charwak Chowk, Near Ganajan Mandir, Indira Nagar, Nashik
Contact : 0253 2321997
Principal : Mrs. Vimal Kakad

Academic Calendars

Gallery