आभासी वर्ग ची उद्दिष्टे

​​१) शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील गरज ओळखून शिक्षकांना , विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविणे.

२) विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यांच्या गरजेनुसार , आवडीनुसार शिक्षण उपलब्ध करून देणे.

३) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहणे.

४) जीवनोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी त्यातून ताण-तणाव व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणे.

५) विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे -जेणेकरून ते समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून विकसित होतील.

अभ्यासक्रम : इ.१ली, २री साठी...

१. मूळाक्षरे (पूर्वतयारी)स्वर_ व्यंजन
२. शब्द वाचन_लेखन
३. अॅ, आॅ चे शब्द
४. चित्ररुप गोष्ट
५. चित्र वर्णन/वाचन
६. कविता,गाणी, बडबडगीते
७. ‘र’ चे शब्द ( ऱ्य, त्र, कृ प्र र्व )
८. एक _अनेक
९. छोटी वाक्ये तयार करणे.
१०. जोडाक्षरयुक्त शब्द
११. बोली भाषा_ प्रमाण भाषा शब्द.

अभ्यासक्रम : इ.-३री,४थी (विषय-भाषा)

१)शब्द /वाक्प्रचार /म्हणी यांची व्युत्पत्ती.(उगमस्थान)
जीभेला व्यायाम- tongue twister..(उदा.-काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले !!)

२) गोष्टी तयार करता येणे (आरंभ बिंदू म्हणून एखादा शब्द किंवा वाक्य देणे..)

३) दिलेल्या विषयावर बातमी तयार करता येणे..

४) दिलेल्या विषयावर निवेदन करता येणे..

५) चित्र दाखवून संवाद लेखन..पात्रांना नावे इ.

६)कोरोना काळातील परिसरातील सकारात्मक गोष्ट.

७) बोलीभाषेतील /ग्रामबोलीतील कविता.

८) शब्द एक..अर्थ अनेक..

९) गोष्टीतील नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद ओळखणे.

अभ्यासक्रम : इयत्ता पाचवी, सहावी

1. श्रवण कौशल्य विकसित करणे-
सुंदर कविता, मनोरंजक गोष्टी, त्यांच्याच वयोगटातील मुलांनी दिलेली भाषणे ऐकवणे, बोधप्रद कथा ,सुवचन ,सुविचार ऐकवणे, रोजच्या रेडिओवरील बातम्या ऐकावयास सांगणे.
(थोडक्यात विद्यार्थ्यांचे कान तयार करणे)

2. वाचन कौशल्य विकसित करणे
* कॅलेंडर वाचन -मराठी इंग्रजी महिन्यानुसार.*वर्तमानपत्रातील मथळे वाचन, अवतीभवती दिसणारे सूचनाफलक यांचे वाचन, धड्यांचे वाचन, छोट्यांसाठी असलेल्या पुस्तकांचे, मासिकांचे वाचन, मोबाईल मधल्या संदेशांचे वाचन, उच्चारण शुद्धतेसाठी छोट्या स्तोत्रांचे ,श्लोकांचे वाचन.

3. लेखन कौशल्य विकसित करणे-
विरामचिन्हांची दखल घेऊन शुद्ध सुवाच्च लेखनासाठी आग्रह धरणे.. त्यासाठी हस्ताक्षर सुधारणा मार्गदर्शन.
दैनंदिनी रोजनिशी लेखन, शुभेच्छा पत्रासाठी ओळी तयार करण्यास उद्युक्त करणे, एखादा विषय शब्द देऊन चारोळी अथवा काव्य करण्यास स्फूर्ती देणे उदाहरण वारा… वाऱ्या रे वाऱ्या ,तू माझा मित्र खरा, आता थांब व बाबा ,या घामाच्या धारा….

4. संभाषण, भाषण, अभिव्यक्ती
संवाद लेखन-आई व मुलगा शिक्षिका व विद्यार्थी शहर व खेडे इत्यादी.
प्रसंग वर्णन… तुमचा वाढदिवस, सहल ,अवतीभवती घडणाऱ्या घटनेचे वर्णन.
आपल्या परिसरातील स्थळांची माहिती आपल्या शब्दात सांगणे.

5. भाषिक कौशल्य संवर्धन…
श्रुतलेखन करणे, म्हणींचा संग्रह-आजी आई वापरते त्या म्हणींचा संग्रह, सुविचार संग्रह, कविता प्रकारांचा संग्रह,
*शब्दांचा बगीचा अंतर्गत…..घरातील धान्य भाजी फळे मसाल्याचे पदार्थ यांची यादी सूची तयार करणे.
*व्यक्तिचित्रण करणे… आई,वडील, मित्र ,शेजारी
*स्वमत अभिव्यक्तीस चालना देणे… माझे कर्तव्य ,माझे काम इ.
*सांकेतिक भाषा-उदाहरण’च’ ची भाषा, अनुप्रास युक्त वाक्य तयार करणे.

6. दैनंदिन व्यवहारात आपला सहभाग ठेवणे (भाषिक व्यवहाराच्या माध्यमातून)
*मित्र लेखक-कवी आपले शिक्षक यांना पत्र लिहिणे.
*चालू घडामोडींशी संबंधित एखादी कविता ,गोष्ट सादर करून ऑडिओ व्हिडिओ द्वारा इतरांपर्यंत पोहोचणे.
*विनोद सांगणे …ती शैली आत्मसात करणे.
*एखादा भाषिक प्रयोग व्हिडिओ द्वारे सादर करणे.

7. भाषिक उपक्रम
*चिठ्ठी उचलून खेळ खेळणे
उदा.पाच फळांची नावे ,,नकला करणे स्तोत्र ,गाणे, कविता म्हणणे
*शब्द रूपे लिहिणे… रडणे … रडली…. रडलेली
*रंग सांगून त्या रंगांच्या वस्तू फळे प्राणी इत्यादी नावे विचारणे.
*एखादा शब्द सांगून तो वेगवेगळे भाव वापरून बोलून दाखवणे
उदा. आई….,,(लाडिक, हाक, घाबरून ,रडून ,हट्टाने इत्यादी)
*रफार युक्त शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे लेखन.
*एकाच अक्षराने सुरुवात होणारे शब्द उकार युक्त शब्द .आवाज दाखवणारे शब्द ,विसर्ग युक्त शब्द ,अनुस्वार युक्त शब्द ,समान अक्षराने शेवट होणारे शब्द लेखन

8. मराठी साहित्य प्रकारांची ओळख….
*प्रत्येक काव्य प्रकाराची ओळख करून देणे..
उदा श्लोक भूपाळी अभंग ओव्या पोवाडा भजन चारोळी इत्यादी
*एक पात्री एकांकिका कथाकथन सुंदर भाषण , सुंदर नाट्यीकरण खुदा नटसम्राट…यांचे उत्कृष्ट नमुने दृक-श्राव्य माध्यमांच्या द्वारा दाखवणे.

9.इतर भाषिक कौशल्य
चित्र शृंखला देऊन कथालेखन करणे.
*मोबाईल वर एखादा संदेश स्वतःच्या कल्पनेने तयार करणे.
*रंगीबिरंगी औचित्यपूर्ण स्टिकर वापरून घोषवाक्य तयार करणे.
*जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरे देणे
*सूचनाफलक तयार करणे.

10. भाषिक ज्ञानसमृद्धी…
*वाचनालयातील व्यवहार समजून घेऊन आपणही खाते उघडून पुस्तके वाचण्याची सवय लावून घेणे.
*E- पुस्तके वाचणे.
*पुस्तकातील लेखक कवींच्या मुलाखती वा इतर ऐकणे.
*रोज एका प्रसिद्ध वक्त्याचे भाषण ऐकणे.

११. भाषिक गमती जमती मधून ज्ञानसंवर्धन….
*दिशांची नावे व क्रम लक्षात ठेवण्यासाठी अर्थपूर्ण वाक्यातून लक्षात ठेवणे.
उदा. पडला वामन उसात इतक्यात पुणेकर आला दरीदरीतून नैचत नैचत…
*जिल्ह्यांची नावे -वरील प्रकारे
*वाक्याचे उलट सुलट वाचन सारखे असणे.
उदा. तो कवी डालडा विकतो.
तो कवी ईशाला शाई विकतो.
रामाला भाला मारा.
*शब्द भेद..
१ फुलांच्या माळा केसात माळा.
२ हार झाली की हार मिळत नाही.
३ काढा पिऊन एक झोप काढा

१२. नाविन्यपूर्ण भाषिक प्रयोग करणे.
१. आवडत्या पाककृतींचे व्यवस्थित लेखन करणे.
२. वर्तमान पत्रात प्रकाशित होण्यासाठी स्वरचित छोटे लेख किंवा कविता पाठवणे.
३. आपण खेळत असलेल्या पारंपारिक खेळांची माहिती लिहिणे.
४. वाद्यांचे चित्र काढून माहिती लिहिणे.
५. मुळाक्षरांची कल्पकतेने चित्र काढणे.
*******

अभ्यासक्रम : इयत्ता -सातवी -भाग 1 विषय -मराठी

1…..सुंदर हस्ताक्षर शुद्धलेखन कॅलिग्राफी इत्यादी
बाबत मार्गदर्शन आणि महत्व सांगणे -यातून विद्यार्थी हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल व लेखन क्षमता विकसित होण्यास मदत .


2.स्टीव्ह जॉब्स यांचे जगण्याचे 10 नियम आपण सांगून …तुमचे ध्येय या विषयावर बोलण्यास व लेखनास प्रेरित करू शकतो -आपण सुंदर उदाहरणाद्वारे हे नियम सांगून तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे आहे हे विचारून ..तुमचे ध्येय या विषयावर लेखन करण्यास उद्युक्त करणे ..यातून श्रवण ,संभाषण ,लेखन क्षमता विकसित होतील बरोबरच व्यक्तिमत्व विकास होईल .

3.स्वतःचा पत्ता लिहिण्यास सांगून …आपल्या आवडत्या कवीला ,लेखकाला,खेळाडूला ,अभिनेत्याला ,
प्रसिद्ध व्यक्तीला पत्र लिहिणे …..लेखन क्षमता विकसित होऊन पत्रलेखन सराव होईल

4. सुंदर नाट्यीकरण नमुना दाखवून ….नाट्यीकरण तयारी करवून घेणे उदा .नटसम्राट स्वगत ….श्रवण ,भाषण व नाट्यीकरण क्षमता विकसित होण्यास मदत .

5.काव्यप्रकाराची ओळख करून देणे .उदा ..श्लोक ,भूपाळी ,अभंग ,ओव्या ,पोवाडे ,भजन इत्यादी ……विद्यार्थ्यांना माहित असलेल्या प्रकारांपैकी त्यांच्याकडून 1 प्रकार म्हणून घेणे व त्यांना लिहिण्यास सांगणे ….श्रवण ,काव्यगायन ,लेखन क्षमता विकास संस्कृतीची ओळख .

6.गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा –शेतकरी ,दुकानदार ,सरपंच ,ग्रामसेवक ,डॉक्टर
तलाठी ,शिक्षक …….मुलाखत प्रश्नावली देऊन मुलाखत घेण्यास उदुक्त करणे ……श्रवण ,संभाषण ,लेखन विकासाबरोबरच संवाद साधने ही क्षमता विकसित होईल .

7.स्वमत विकास चालना देण्यासाठी …विषय देऊन स्वमत व्यक्त करण्यास सांगणे ..उदा . मोहरा मनाकडे वळवा ,माझी सृजननिर्मिती ……भाषण ,लेखन क्षमता व मनातील भावना व्यक्त करण्यास वाव मिळेल .व्यक्तिमत्त विकास .

8.सांकेतिक भाषा ….उदा .च ची भाषा उलट्या क्रमाने शब्द बोलणे , क पासून परिच्छेद तयार करणे ……….श्रवण , भाषण लेखन क्षमता विकसित …..मनोरंजनातून शिक्षण .

9.लेखनास उद्युक्त करणे …उदा .चारोळी (स्वरचित ),कविता (स्वरचित ,अन्य रचित )…………..श्रवण , काव्यगायन ,लेखन क्षमता विकास .

10.शब्दतारका ……जोडाक्षरलेखन , वाचन ,उच्चरण चुका सुधारणा (वाचन ,लेखन ,भाषण क्षमता विकास होण्यास मदत .

11.विरामचिन्हे ओळख ,वापर कुठे व कसा करायचा ,रंजकरित्या ,खेळ व गाण्याच्या माध्यमातून समजावून सांगणे ………श्रवण ,लेखन क्षमता विकसित होणे .

12.एखादा उत्तम कथाकथन नमुना सादर करून विद्यार्थ्यांकडून कथाकथन सादरीकरण करून घेणे …..छोटी कथा किंवा काल्पनिक ,विनोदी कथा ,लिहिण्यास प्रवृत्त करणे ……श्रवण ,भाषण ,लेखन क्षमता विकास .