WhatsApp Image 2020-01-10 at 11.42.46 PM

Swami Vivekanand Vidyalaya, Morwadi Secondary

About the School

List of Principals

Gallery

Events

Acheivements

Annual Gathering

Sports

Annual Report 2018- 2019.

नमस्कार ,
स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टि.जे. चौहान ( बिटको) हायस्कूल मोरवाडि या शाळेचा वार्षिक अहवाल सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. सन 2020 या शैक्षणिक वर्षात विद्यालयात 1190 विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहेत. शालांत परीक्षा मार्च 2019 चा निकाल 95.04% टक्के लागला असून कु. यशोधन संतोष नाडणकर या विद्यार्थ्यांनी 91.40 % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा , शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा,होमी भाभा, नवोदय, एन.एम.एम.एस, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी, संस्कृत परीक्षा, इंग्रजी ओलंपियाड या परीक्षा घेतल्या जात असून मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाते. या सर्व परीक्षांचे निकाल ही उत्तम लागले आहेत. या वर्षी एन.एम.एम.एस परीक्षेत कु. भाग्यश्री आश्रोबा अवचार,कु. दिपक योगेश सदावर्ते ,कु.उदय हेमचंद्र तळोले या तीन विद्यार्थ्यांना सलग चार वर्षे वार्षिक बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे .इंग्रजी ओलंपियाड परिक्षेत इयत्ता नववी अ तील कु. प्रथमेश उत्तम घुगे हा विद्यार्थी भारतात प्रथम आला असून द्वितीय फेरीस‌ पात्र ठरला. * क्रीडा विभाग - आंध्रप्रदेशातील गेला होता कडप्पा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कु.हिमांशी मुकेश ओतारी हिची महाराष्ट्राच्या संघात कर्णधारपदी निवड झाली.पुणे सासवड येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुलींच्या संघास तृतीय क्रमांक प्राप्त झाला. शालेय राज्यस्तरीय थ्रो-बॉल निवड चाचणी स्पर्धा 19 वर्ष वयोगटात कु. ओम सुनील घोलप, कु. रोशन कैलास अहिरराव, 14 वर्षे वयोगटात कु.शिवम रोहिदास राठोड या विद्यार्थ्यांची निवड झाली. औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय शुटींगबॉल निवड चाचणी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात कु.सागर सुधाकर टर्ले याची निवड करण्यात आली. **राष्ट्रीय हरित सेना - राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत शाळेत तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षदिंडी जलदिंडी चे आयोजन, इको फ्रेंडली सण, उत्सव , अंतर्गत इको फ्रेंडली शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणे , निर्माल्य व मूर्ती संकलन,इको फ्रेंडली होळी, दिवाळी, रक्षाबंधन, अझोन दिवस इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले जाते. R .S.P - रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत छोटा पोलीस, रस्ता सुरक्षा, चिल्ड्रन ट्राफिक एज्युकेशनल पार्कला भेट, वाहतूक सुरक्षा सप्ताह, रेझींग डे यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यश/ निवड /पुरस्कार या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेतील गुणवंत शिक्षकांना प्राप्त झालेले पुरस्कार पुढील प्रमाणे... १) जिल्हास्तरीय "शिक्षण तपस्वी" पुरस्कार म्हणून क्रीडा शिक्षक श्री दिनेश भिवाजी अहिरे यांना पुरस्कार प्राप्त २) क्रिकेट अकॅडमी तर्फे राष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू घडविणारे क्रीडाशिक्षक श्री.कीर्तिकुमार भरत गहाणकरी कै.भाऊसाहेब सोनवणे नविन नाशिक भूषण पुरस्कार प्राप्त. ३) श्री प्रदीप सिंग मुरलीधर पाटील यांचे दैनिक देशदूत नाशिक साठी "शैक्षणिक प्रतिनिधी" म्हणून निवड सामाजिक वनीकरण विभाग , महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद (माध्य) व (उच्च माध्य.) शिक्षण विभाग यांच्या वतीने "पर्यावरण समन्वयक* म्हणून नियुक्ती नाशिक जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम 140 % राबविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक मा. श्री दिनकर पाटील यांच्या हस्ते गौरव व सत्कार करण्यात आला. ४) कर्मयोगी बहू सेवाभावी संस्था व तनिष्का फोरम तर्फे संगीता प्रमोद कांगुणे यांचा राज्यस्तरीय कर्मयोगी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या भेटी :- या शैक्षणिक वर्षात शाळेला प्रभागातील नगरसेविका मा. सौ किरण गामणे व सौ. कावेरी घुगे, डॉ. जोत्सना सोनखासकर,श्री. विजय जोशी, डॉ. तेजू सोलोमन, अॅड.श्यामला दीक्षित, सौ सुवर्णा क्षिरसागर, मंजुषा मिराणकर, श्री. राजेश पाटील व धीरज देशमुख सौ. सीमा अडकर कु. बागेश्री पारनेरकर तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण विभाग ,सामाजिक वनीकरण व शहर वाहतूक पोलीस दलाचे अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी दिल्या. शालेय अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमच्या शाळेत वेळो-वेळी निबंध, वकृत्व,वेशभूषा, समूहगीत,श्लोक पाठांतर हस्ताक्षर ,चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध विषयांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. अहवालाच्या माध्यमातून कळविण्यात अत्यंत आनंद होतो की ,आमच्या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले आहे. शाळेचे उत्तरोत्तर प्रगतीसाठीआम्हाला संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभते. तसेच पालक व समाजातील मान्यवरांची वेळोवेळी बहुमोल सहकार्य लागत असते त्यामुळेच आमची शाळा उत्तरोत्तर प्रगती करून यशोशिखर गाठत आहे.*