स्वामी विवेकानंद संस्था


स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षात सन १९६४ साली स्वामी विवेकानंद संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतीय संस्काराची व संस्कृतीची इंग्रजी माध्यमाची शाळा गंगापूर येथे श्रीमद् जगत्गुरू शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या आश्रमात अत्यंत कमी विद्यार्थी संख्येवर सुरू केली. रविवार पेठ येथे त्याच काळात म्हणजे सन १९६४ साली प्राथमिक विभाग, इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. नंतर सन १९७० मध्ये पंचवटीत इंग्रजी माध्यमाची माध्यमिक विद्यालय सुरू केले. सन १९७१ साली पंचवटीत मराठी माध्यम सुरू केले. सन १९८४ साली इंदिरानगर येथे मराठी माध्यमाची शाळा सुरू करून आज प्रशस्त क्रीडांगण व अद्ययावत इमारतीत स्थलांतर केले. सन १९८६ साली मोरवाडी येथे मराठी माध्यमाची शाळा सुरू करून अद्ययावत क्रिडांगणासह भव्य नव्या इमारतीत ही शाळा सुरू आहे. . एका छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, पंचवटी विभागासाठी भव्य, दिव्य इमारतीचे स्वप्न संस्थेचे पदाधिकारी बाळगून आहेत`. आज या संस्थेच्या शाळेतून शिक्षण घेऊन अनेक नामवंत उद्योजक, कारखानदार, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रिडाधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, वकील, राजकीय नेते, लेखक, शास्त्रज्ञ, पोलीस अधिकारी, शिक्षण संस्था चालक, देश व विदेशात मोठमोठ्या हुद्यावर अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी संस्काराची शिदोरी, संस्कृतीची जाणीव, समर्पणाची भावना, आपल्या कार्यावरील निष्ठा सेवाभाव, या गुुणांमुळे ते शाळेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. आजही संस्थेच्या सर्व शाखांतून हजारो-विद्यार्थी शिक्षण घेत असून ते बाह्य परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य-गायन स्पर्धा, नाटक-अभिनय, क्रीडा-कला विभागात अग्रेसर आहेत. संस्थेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, गरीब व मध्यम वर्गीय पालकांना, आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून अत्यंत नाममात्र शुल्कात शिक्षण प्राप्त व्हावे म्हणूून संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेच्या प्रत्येक शाळेत मोफत पुुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, माध्यान्ह भोजन दिले जात असून, विद्यार्थी हा केंद्रबिंदूू मानूून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, अत्याधुनिक सोयींनी युक्त संगणक कक्ष, भव्य प्रयोग शाळा, प्रशिक्षित, अनुभवी शिक्षक वर्ग याची संस्थेने पुरेपूर काळजी घेतली आहे. ज्या स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका देशातच नाही तर विदेशातही फडकावली, तशी ही शिक्षणाची पताका स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थी दिमाखाने फडकावत आहेत. आज संस्थेचेच विद्यार्थी  संस्थेच्या कारभाराची, प्रगतीची धुरा सक्षमपणे वाहत आहेत. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विक्रमजी सारडा, उपाध्यक्ष मा. श्री. जयसिंगजी पवार, सचिव मा. श्री. सुनीलजी बागुल आणि इतरही सदस्य समर्थ व सक्षमपणे संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत आहेत. चला, आपणही असाच थोडासा खारीचा वाटा उचलून या उपक्रमात सहभागी होऊ या!

- श्री खाम्बेकर सर

Managing Committee 2019-20

Shri Vikram Deokisan Sarda
President
Shri Jaising Jaywantrao Pawar
Vice-President
Shri Sunil Jagannath Bagul
Secretary
Smt. Vrunda Narendra Joshi
Joint Secretary
Shri Ramesh Namdevrao Mate
Treasurer
Smt. Aashumati Satish Tonpe
Member
Smt. Madhuri Ashok Deshpande
Member
Smt. Prerana Prakash Kulkarni
Member
Shri Ratnakar Rajaram Velis
Teacher's Representative (Primary)
Smt. Nilima Rajendra Patil
Teacher's Representative (Secondary)